Share

पाच संघटनांकडून राज ठाकरेंच्या सभेला विरोध; पोलीस आयुक्तांना पत्र!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. पण राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे, कारण वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी असे पत्र पोलीस आयुक्तांना पाठवत ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे.

एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे या सभेला विरोध केला जात आहे. पोलीस आयुक्तांना भेटून सध्याची परिस्थिती, रमजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय पुढे करत, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली जात आहेत. काल दिवसभरात वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, मौलांना आझाद विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना, ऑल इंडिया पँथर सेना या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी असं निवेदन दिले आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयात मनसेने राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिले आहे. यावर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरातील पोलीस निरीक्षक यांची बैठक झाली. त्यात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!