Share

भाजप नेते अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल!

Published On: 

अमरावती : काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी भाजप नेते अनिल बोंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर व शासनाची बदनामी केली त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे विधान केल्याप्रकरणी बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी हरिभाऊ मोहोड यांनी केली होती. आता या प्रकरणी अनिल बोंडे यांच्या विरोधात अमरावतीच्या गाडगेनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहोड यांच्या तक्रारीवरून अनिल बोंडे यांच्यावर कलम ५०२ (२) अंतर्गत गुन्हादाखल करण्यात आला आहे.

अनिल बोंडे म्हणाले होते, “दुर्दैव आहे की, अमरावती दंगलीमागे मास्टर माईंड अभय महात्मे असल्याच्या बातम्या मीडियासुद्धा देत आहे. अभय महात्मे मास्टर माईंड नाहीये. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर दंगलीमागच्या मास्टर माईंड आहेत.”

यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांच्यावर पलटवार करत म्हणाल्या होत्या. “अनिल बोंडे हे फस्ट्रेशनच्या फेजमधून जात आहेत. विक्षिप्तपणाने कधीपण भडकवण्याची भाषा करत असतात. त्यांना अमरावतीचं वातावरण अस्वस्थ करायचं आहे. या प्रकरणी पोलिस तपास यामध्ये सुरु आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. देशात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम भाजपवाले करत आहेत. तोच एक प्रकार म्हणजे बोंडे आहेत.” असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!