Share

निवडणूक लढवायची की नाही ? आम्ही राजसाहेबांच्या आदेशाची वाट पाहत आहोत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक लढवाची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने २०१९ मधली लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे काय करणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली. मात्र निर्णय काय झाला ते जाहीर करण्यात आलेले नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची येत्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका असावी याबाबत चर्चा करण्यासाठी राजसाहेबांनी नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली होती. पक्षाची अधिकृत भूमिका राजसाहेब लवकरच जाहीर करणार आहेत. आपण त्यांच्या निर्णयाची आणि पुढील आदेशाची प्रतिक्षा करत आहोत. अस मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याबाबत नेत्यांची मतं जाणून घेतली. काही नेत्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर काहींनी नाही, मात्र आता नेमके काय होणार, पुढे काय भूमिका जाहीर करायची याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर करतील असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!