🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीविषयी भाष्य करताना ‘वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ‘ए प्लस’ मतदारसंघ आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारे या मतदारसंघातील दिग्गज एकाच मंचावर उपस्थित आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचं निश्चित करावं असं विधान केले आहे’
पुढे बोलताना परब यांनी ‘ पण इथला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असंही जाहीर केलं. तसेच पुढे बोलताना परब यांनी आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार, असा शब्दही शिवसैनिकांना दिला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विधानसभेत शिवसेनेसोबत युती राहील, परंतु आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत घोषणा करणारे अनिल परब हे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या या उत्तरामुळे भाजपचाचं मुख्यमंत्रीपदावर प्रबळ दावा असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पक्षाच्या महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. शुक्रवारी त्यांची सभा नांदेडमध्ये पार पडली. तसेच आज ते लातूर जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी ते वेगवेगळ्या सभांना संबोधित करणार आहेत.
- ‘शेवटी ते राजे आहेत, आम्ही त्यांची ‘ही’ इच्छाही पूर्ण करू’
- भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे
- दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी पायी चालत यात्रा काढेल- आदित्य ठाकरे
- मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा अजेंडा : मुख्यमंत्री


