टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करणार असल्याची घोषणा खुद्द उदयनराजे यांनी केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रवेशाचे पोस्टर त्यांनी शेअर केले आहे.
‘वारसा जिजाऊ शिवबाचा, धमन्यात उसळते रक्त, एकदिलाने आता लढाई रयतेच्या विकासासाठी फक्त’ असा नारा देणारे पोस्टर उदयनराजे यांनी यांच्याकडून पोस्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एवढे दिवस सुरु असणाऱ्या चर्चेला विराम लागणार असून उदयनराजे आता भाजपवासी होणार आहेत.
यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘उदयनराजे यांनी पक्ष का सोडला हेच कळत नाही. पण राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी भाजप दबावाचं राजकारण करत आहे. रयत ही राष्ट्रवादीबरोबर कायम राहते. प्रत्येक नेत्याला वाटतं की त्यांनी पक्ष सोडला म्हणजे जनता त्यांच्याबरोबर जाईल. पण असं होत नाही, जनतेला खरं काय ते कळतं. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु केलं आहे अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
- दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी अतिरिक्त निधी द्या- महेश लांडगे
- एमआयएमला माझ्याकडून गुडलक – प्रकाश आंबेडकर
- राष्ट्रवाद हिच पहिली निष्ठा; पालकमंत्री निलंगेकर यांचे मत
- आता एमआयएमने दिला राष्ट्रवादीला धक्का, नेत्याला प्रवेश देत जाहीर केली उमेदवारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

