वाशीम : मागील काही दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेल्या शेतमालाचे आतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्यांना तात्काळ हेक्टरी ५0 हजार रुपये आर्थिक द्यावी, रब्बी पिकांसाठी मोफत बी-बीयाणे द्या आदी मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या नेतृत्वात घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
वाशीम तालुक्यातील काटा गावात अंदाजे २२५ हेक्टर उस पीक आडवे झाले. मंगरुळपीर, मानोरा व इतर तालुक्यामध्ये सोयाबीनच्या शेंगा नुसत्याच फुगल्या आहेत व झाडांची अवास्तव वाढ झाली असून, परतीच्या संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे शेतकर्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. फळबागामध्ये फळझाडे जागीच आडवी झाली असल्याने फळांची माती झाली आहे.
अतवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाली असून, जमीन खरडली आहे. एवढे होऊनही नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतात अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत खरीप हंगामातील प्रामुख्याने उडीद, मुंग, सोयाबीन, ज्वारी मका, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र प्रशासन निद्रावस्थेत असल्याने त्यांची झोप उडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी आंदोलन करूनसुद्धा मदत मिळत नसल्याने, बहिर्या सरकारपर्यंत आवाज पोहोचावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने व शेतकर्यांनी घंटानाद, थाळीनाद आंदोलन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, मानोरा तालुका अध्यक्ष मनोज खडसे, शहराध्यक्ष महादेव भस्मे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मुळे, जिल्हा सरचिटणीस अमोल गाभणे, ता. अध्यक्ष मोहन कोल्हे, रवि वानखेडे, किशोर गजरे, मोहम्मद नौरंगाबादी, शिवाजी नवगणकर, विठ्ठल राठोड, विमला राठोड, मैनोद्दीन काजी, केशव कांबळे, गणेश जाधव, दत्ता उगले, रवि बानकर, दिलीप जुनघरे, मधुकर मुसळे, किशोर शिंदे, हनुमान घोडे, आबा सोनटक्के, अहिर, गोकुल जाधव, रमेश चव्हाण, रुख्मीणा वानखेडे, बेबीबाई धुळधुळे, बेबीबाई भगत, वंदना अक्कर, गुलाब भगत, रवी राऊत, राजू किडसे, शिवाजी शिंदे, सुनिल वाघ, गजानन कुटे, देशमुख, चेतन गव्हांदे, हर्षल मोरे, अशोक नाईकवाडे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
महत्वाच्या बातम्या :-
- आगामी ‘लाल सिंग’ मधील अमीर खानचा नवा लुक व्हायरल
- जिल्हा रुग्णालयात कोरोनाने मृत्यू पावलेल्या महिलेचे दागिने लंपास!
- विदर्भात ‘का’ पेटली नागपूर कराराची होळी, शंभरवर्षांच्या संघर्षासाठी हजारो वैदर्भीय रस्त्यावर
- ‘या’ शहरात काँग्रेस भोला भवनातून निघाला बैलबंडीतून मोर्चा, आंदोनाचे नेमके कारण…
- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’साठी अंगणवाडी सेविकांचा नकार, आता जबाबदारी गुरुजींच्या खांद्यावर


