Share

‘या’ शहरात काँग्रेस भोला भवनातून निघाला बैलबंडीतून मोर्चा, आंदोनाचे नेमके कारण… 

Published On: 

🕒 1 min read

गोंदिया : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत असून आज सोमवारी (दि.२८) गोंदिया जिल्हा काँग्रेस भोलाभवनातून बैलबंडी मोर्चा काढून मुख्य बाजार मार्गक्रमण करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या राजव्यापी आंदोलनानिमित्त हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावर प्रदेश सचिव अमर वराडे व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एड.नामदेवराव किरसाना यांच्या नेतृत्वात करण्यात आले.त्यांनतर राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फेत निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड. किरसान की केंद्र सरकारने घाईघाईने मंजूर कलेली ही विधेयके शेतकर्‍यांना संपूर्णपणे उद्धवस्त करणारी आहेत. शेतकर्‍यांना आता हमीभावाचे संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने बाजार समित्यांची स्थापन केली होती. या शेतकर्‍यांच्या संस्था असून, या संस्था त्यांच्यासाठी मोठा आधार आहेत, त्या संस्थाच केंद्र सरकारने मोडीत काढल्या आहेत. नव्या कायद्यामुळे खासगी व्यापार्‍यांचे भले होणार आहे.

शेतमाल कवडीमोल भावाने घेतला जाईल, हा मोठा धोका ओळखून शेतकर्‍यांच्या हितासाठी काँग्रेसने जनआंदोलन आहे.काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे म्हणाले की,या बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या कामगार कायद्यामुळे त्यांना अनेक हक्क प्राप्त झाले होते. कंत्राटी कामगार कायम होत होता, पण आता नव्या कायद्यामुळे कायम कामगारही कंत्राटी होणार असून, कामगारांना मालकांचे गुलाम बनवणारा हा कायदा आहे.

शेतकरी व कामगार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी ‘किसान मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे. आंदोलनात रमेश अंबुले,आलोक मोहंती,जितेश राणे,योगेश अग्रवाल,नागरत्न बनसोड,सूर्य प्रकाश भगत, जहीर अहमद, रमेश निकेश मिर्शा,दलेश नागदेवने,अमर राहुल, सुशील खरकाटे, कीर्ती येरने, योगेश शरणागत, नितेश मेंन्ढे, नफीस सिद्दीकी, अरुण गजभिए, अनमोल वैद्य,गंगाराम बावनकर, बाबा बागडे, हरीश तुलस्कर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!