अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत. आरोग्य सेवेचेही तीनतेरा वाजले आहेत.
अमरधाममध्येही वेटिंग लिस्ट आहे. अशा या महामारीत काही कोरोना योद्धे जिवाची पर्वा न करता पेशंटसाठी सेवा देत आहेत. मात्र, दुसरीकडे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षामधील मृत रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याबाबत नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयातील संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
कोरोनाची बाधा झाल्याने वडारवाडी (भिंगार) येथील एका महिलेला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. तेव्हा महिलेच्या अंगावर दागिने होते. ते दागिने कोणीतरी काढून घेतले आहेत. तशी फिर्याद संबंधिताने तोफखाना पोलिसांत दिली आहे. त्या अनुषंगाने तोफखाना पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे.
या प्रकाराबाबत सिव्हिल प्रशासन चौकशी करीत आहे. संबंधित विभागातील मेट्रनच्या म्हणण्यानुसार त्या रूग्णांचे दागिने नातेवाईकांकडे दिले होते. परंतु नातेवाईक म्हणतात, ते आम्हाला मिळालेले नाहीत. त्या विभागात सीसीटीव्ही आहेत. ते फुटेज तपासल्यानंतर खरा काय प्रकार आहे, तो समोर येईलच. स्टाफमधील कोणी दोषी आढळल्यास त्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. अशी प्रतिक्रिया प्रभारी जिल्हा शल्य चिकित्कसक सुनील पोखरणा यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- नगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस
- मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? सामनातून मराठा आंदोलनावर सवाल
- आम्ही मराठा समाजासोबत मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे
- देशातील पहिल्या महिला अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सेहगल यांचे खास डूडल
- आगामी ‘लाल सिंग’ मधील अमीर खानचा नवा लुक व्हायरल


