चिमूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची जबाबदारी आता गुरुजींवर असणार असून, ऑक्सिजन व तापमान लेवल तपासणीचे काम करण्यास आशा व अंगणवाडी सेविका यांनी नकार दर्शवल्याने ही जबाबदारी आता गुरुजी पार पाडणार आहेत. यासाठी आरोग्य विभागाकडून गुरुजींना काम देण्यात आले असून, तसे आरोग्य विभागाने फर्मान सोडले आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्याच व्यक्तींचे ऑक्सिजन व तापमान लेवल तपासणी करण्यात येत होती. तर मध्यंतरी आशा व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून ५0 वर्षावरील व्यक्तींचे ऑक्सिजन लेव्हल व तापमान तपासन्या करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेत कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची ऑक्सिजन लेवल व तापमान तपासण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने विकसित केलेल्या एका अँपमध्ये ही संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे.
यामध्ये चिमूर तालुक्यातील जवळपास एकूण एक लाख ६९ हजार ५४७ लोकसंख्या असून, ४२ हजार ८५0 घरे आहेत. ही नवीन मोहीम आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. मात्र, आशांनी या मोहिमेला नकार दिला. त्यानंतर अंगणवाडी सेविकानीही या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच आरोग्य विभाग आता जवळपास ५५0 गुरुजींच्या माध्यमातून ही मोहीम राबविणार असून, तसे पत्र आरोग्य विभागाकडे व शिक्षण विभागाकडे सुद्धा आले आहे. यासाठी गुरुजींना प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार असून, प्रत्येक घरोघरी जाऊन ही तपासणी मोहीम राबविणार आहेत.
सदर मोहिमेत आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे. सदर मोहीम हि १५ सप्टें ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राबवायची असून, सदर मोहिमेसाठी ३ सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे. सदर टीममध्ये शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस व स्वयंसेवक नेमून सर्वेक्षण करावयाचे आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात घर भेटी देऊन सर्वेक्षण करणे, करिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची जबाबदारी गुरुजींवर देण्यात आली आहे. चिमूर तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर काही शिक्षकांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आली. बीएलओचा पुन्हा अतिरिक्त भार दिल्याने पुन्हा शिक्षकांमध्ये रोष निर्माण होत असल्याचे सहाय्यक शिक्षक कवडू लोहकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
- देशातील पहिल्या महिला अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सेहगल यांचे खास डूडल
- आगामी ‘लाल सिंग’ मधील अमीर खानचा नवा लुक व्हायरल
- जिल्हा रुग्णालयात कोरोनाने मृत्यू पावलेल्या महिलेचे दागिने लंपास!
- विदर्भात ‘का’ पेटली नागपूर कराराची होळी, शंभरवर्षांच्या संघर्षासाठी हजारो वैदर्भीय रस्त्यावर
- ‘या’ शहरात काँग्रेस भोला भवनातून निघाला बैलबंडीतून मोर्चा, आंदोनाचे नेमके कारण…


