Share

विदर्भात ‘का’ पेटली नागपूर कराराची होळी, शंभरवर्षांच्या संघर्षासाठी हजारो वैदर्भीय रस्त्यावर   

Published On: 

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात विविध संघटनांच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नागपूरसह गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती अन यवतमाळमध्येही नागपूर कराराची होळी करण्यात आली.

सुमारे शंभर वर्षांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा पाया नागपुरात असला तरी विदर्भ राज्य अंदोलन समितीचे कार्यकर्ते संपूर्ण विदर्भात आहेत. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी एक शतकाहून अधिक काळापासून हे आंदोलन सुरू असून, त्यास हवे तसे यश आलेले नाही. तत्कालीन राज्यकर्त्यांनी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार केला होता. त्यानंतर १ मे १९६0 रोजी विदर्भासह महाराष्ट्राची निर्मिती झाली. करारातील ११ पैकी एकाही कलमाचे पालन आजपर्यंत झालेले नाही. उलट विदर्भाचे शोषणचं झाले असल्याची मानसिकता वेगळा विदर्भवाद्यांची आहे.

विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के नोकर्‍या दिल्या नाही, उच्च पदाच्या नोकर्‍याही आतापयर्ंत दिल्या नाही, चार लाख नोकर्‍या अन्य भागात पळवून नेल्या, विदर्भाला २३ टक्के निधीही दिला नाही, ७५ हजार कोटी रुपये सिंचनाचे आणि आणि पन्नास हजार कोटी रुपये रस्त्याचे अन्य भागात पळविले, गोसेखुर्दसारखी १३१ धरणे तीन दशकांत पूर्ण झाले नाही, विदर्भातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न, सिंचन आणि विकासाचे प्रश्न कायम आहे.

या सर्व प्रश्नांना वेगळे विदर्भ राज्य हे एक उत्तर असल्याचे समितीच्या कोर कमिटीचे सदस्य सुनील वडस्कर यांनी याप्रसंगी म्हटले आहे. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये सर्व जनतेने सहभागी होऊन जनआंदोलन उभारावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले. काटोल तालुक्यात झालेल्या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे, विठ्ठलराव काकडे, धीरज मांदळे, प्रवीण राऊत, नीलेश पेठे, मनोहराव गोलाईत, संजय उपासे, बाबाराव वाघमारे, गिरीश शेंडे, चेतन उमाठे, पुखराज रेवतकर, हृषिकेश सुरजुसे, धनराज तुमडाम, दिलीप सुतोने, नाना चरडे, हर्षद बनसोड, विनीत निकोसे, अरविंद बाविस्कर, आनंद बंड, लोकेश नेहारे, प्रणय भोयर, शुभम माळोदे, गणेश शेंडे इत्यादी विदर्भवादी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!