Share

सुशांतसिंगच्या मुद्द्यावरून राणेंचा पुन्हा हल्लाबोल

Published On: 

मुंबई: भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. यावेळेस त्यांनी सुशांतसिंग राजपूतच्या मुद्द्यावरून राज्यसरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. दिशा सालियनवर (Disha Salian) बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या (Sushant Singh) इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. ८ जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील ८ जूनची पानं कुणी फाडली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना राणे म्हणाले, हा सर्व प्रकार जेव्हा सुशांतसिंगला समजला तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती, त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे झाले, असा देखील प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. तसेच ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली, हॉस्पिटलला त्याला कोणी नेले, याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे ही उघड होणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!