बीड: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) राजकीय मैदानात फटकेबाजी करतातच पण आता त्यांनी क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी करत सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवल्या आहेत.
परळीमध्ये क्रिकेट टुर्नामेन्टचे आयोजन करण्यात आले होते. येथे सुरु असलेल्या सरपंच प्रीमियर लीगचा (Sarpanch Premier League) अंतिम सामना काल (१९ फेब्रुवारी) होणार होता. या सामन्यासाठी धनंजय मुंडे यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांनी सामन्यात भाग घेत ओपनिंग बॅट्समन म्हणून क्रिकेट खेळत सगळ्यांची मनं जिंकली.
15 मिनिटं रंगलेल्या या सामन्यात धनंजय मुंडे यांनी ७ चेंडूंत ११ धावा केल्या. मात्र ४ चौकार आणि तीन डॉट बॉलनंतर त्यांची विकेट पडली. मात्र त्यांच्या फटकेबाजीने सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवल्या. याचा व्हिडिओही सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या फटकेबाजीवर सर्वच फिदा झाले आहेत. राजकीय मैदानाबरोबर धनंजय मुंडेंनी क्रिकेटचे मैदानही गाजवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रोहित पाटील कवठेमहांकाळ निवडणुकीमुळे वादात ; पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव
- Punjab-UP Election 2022 : युपीत तिसऱ्या टप्प्यासाठी तर पंजाबमध्ये सर्व जागांसाठी आज होणार मतदान
- समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सद्गुरू बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द
- अजबच! मानधन न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने स्पर्धा सोडली; पाकिस्तान सुपर लीगने केले त्याला आजीवन बॅन
- तर केंद्र सरकारने Ministry of Dress Design नेमावे; हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

