🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांना काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने पोलिसांनी समन्स बजावले होते. तर आज किरीट सोमय्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर (Chief Minister Uddhav Thackeray)टीका केली आहे.
“मला समन्स बजावण्यात आले आहे. हजर व्हा अन्यथा कायदेशीवर कारवाई होईल. ठाकरे महाशय ते तुमचे प्रवक्ता संजय राऊत बाप, बेटे जेलमध्ये जातील असं सांगत आहे. आम्ही हजार वेळा जेलमध्ये जाऊ. पण तुम्ही यासाठी आम्हाला जेलमध्ये पाठवणार आहात का?”, असा सवाल सोमय्यांनी केला आहे.
तसेच छगन भुजबळांची १०० कोटींची संपत्तीविषयी मी सर्वोच न्यायालयात याचिका केली होती त्यामुळे भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. ४ सप्टेंबरला ती संपत्ती बेनामी घोषित करुन जप्त करण्यात आली. त्याच्याच पाहणीसाठी गेलो असता उद्धव ठाकरे मला जेलमध्ये पाठवत आहेत. मात्र मी अशा धमक्यांना घाबरणारा नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी जमा केलेली संपत्ती जप्त करुन जनतेला देणार. असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सुशांतसिंगच्या मुद्द्यावरून राणेंचा पुन्हा हल्लाबोल
- “त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो, तर…”, उदयनराजे भोसले भावूक
- रोहित पाटील कवठेमहांकाळ निवडणुकीमुळे वादात ; पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव
- Punjab-UP Election 2022 : युपीत तिसऱ्या टप्प्यासाठी तर पंजाबमध्ये सर्व जागांसाठी आज होणार मतदान
- समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सद्गुरू बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
