औरंगाबाद : शहराच्या संभाजीनगर नामकरणासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शहरात दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या एक दिवस आधीच मनसेने आक्रमक भूमिका घेत क्रांती चौकात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारला. या घटनेवर ‘मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी’ असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. शिवसेना संभाजीनगरसाठी बांधील असल्याचे खैरे म्हणाले.
यावर पुन्हा मनसेनंही पलटवार केला. ‘शिवसेना काहीही करणार नाही. या शहराचं नाव मनसेच बदलणार,’ असं मनसेचे नेते सुहास दाशरथे यांनी सांगितलं. संभाजीनगर नामकरण व्हावे यासाठी मनसेने यापूर्वीच अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम संपल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची भूमिका मनसेने घेतली होती. त्याप्रमाणे आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे या आशयाची पत्रकेही खैरे यांच्या अंगावर भिरकावण्यात आली. यावेळी शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या (शुक्रवार, 5 फेब्रु.) औरंगाबाद दौरा होणार आहे, या दौऱ्याच्या आधीच मनसेने राडा केल्याने शहरात चर्चेचा विषय झाला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही तर बाळासाहेबांची इच्छा’, मनसेचे स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
- आम्ही त्यांच्या धमकीला घाबरत नाही; अजित पवारांचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रत्युत्तर
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना


