🕒 1 min read
Gajanan Kale । मुंबई : साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (Pratapgad fort) येथील अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली आहे. यावर मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी भाष्य केलंय.
“अफजलखानाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे”, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, “क्रूरकर्मा अफजलखान याच्या कबरीसमोरचं अतीक्रमण हटवलं याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आहे. अफजलखानाच्या कबरीसमोर उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे, त्याप्रमाणे त्याचं उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला पाहिजे. अफजलखानाच्या विचारधारेचं अतिक्रमण हटेल तोच सुदिन असेल,” असं गजानन काळे (Gajanan Kale) म्हणाले आहेत.
अफझल खानाच्या कबरी समोरचे अनधिकृत बांधकाम हटवलं अगदी तसंच
अफजलखानाचे उद्दातीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे.
अफजलखानच्या विचारधारेचे अतिक्रमण हटेल तो सुदिन असेल.
या कारवाई विरोधात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं.
सरकारचे अभिनंदन— Gajanan Kale (@MeGajananKale) November 10, 2022
“या कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं,” असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
दरम्यान , राज्यातील स्वराज्याचे शत्रू असलेल्या औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करून टाकाव्यात, अशी मागणी आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. राज्य सरकारने या कबरी उद्ध्वस्त केल्या नाही, तर हे काम हिंदू महासंघ करेन, असा इशाराही त्यांनी दिलाय.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup | अर्धशतकासोबत विराटने केला ‘हा’ नवीन विक्रम
- IND vs ENG T20 WC | इंग्लडने भारतीय गोलंदाजांना धो-धो धुतले, सर्व बॉलर फ्लॉप!
- Chitra Wagh । “संजय राठोड विषय आता संपवूया”; चित्रा वाघ असं का म्हणाल्या?
- T20 World Cup | 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करून देखील हार्दिक पांड्याने केला ‘हा’ विक्रम
- Sanjay Raut | “कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे…”; मनसेचा राऊतांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

