Share

T20 World Cup | अर्धशतकासोबत विराटने केला ‘हा’ नवीन विक्रम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये दुसरा उपांत्य सामना (Semi Final)भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 20 षटकांमध्ये 6 बाद 168 धावा केल्या. आज झालेल्या या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये के एल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचे सलामीवीर होते. के ल राहुल 5 धावा करून बाद झाला, तर रोहित ने 28 चेंडूमध्ये  27 धावा केल्या. दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) ने या सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाबरोबरच विराटने आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध भारत या सामान्यादरम्यान, विराटने 43 धावा करताचं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी करणारा विराट हा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यांमध्ये विराट कोहलीने 40 चेंडू मध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहली नंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे नाव आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नंतर न्युझीलँडच्या मार्टिन गुप्टीलचे नाव असून चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आहे. तर यादीत पाचव्या क्रमांकावर आयर्लंडचा खेळाडू पॉल स्टर्लिंग आहे.

दरम्यान आज झालेल्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघावर 10 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी 20 विश्वचषक सामन्यातील अंतिम सामना पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!