🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये दुसरा उपांत्य सामना (Semi Final)भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 168 धावा केल्या. यामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी चांगली कामगिरी केली. या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने 63 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्यांनी 5 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याने या खेळीबरोबर त्याचा एक नवा विश्वविक्रम झाला. पाचव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करत असताना एका वर्षात टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये हार्दिकचा विक्रम
ॲडलेडमध्ये झालेल्या या सामन्यामध्ये नाणेफेक ठरल्यानंतर भारतीय संघाने 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. दरम्यान हार्दिक पांड्या या सामन्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. हार्दिक ने 33 चेंडूमध्ये 63 धावा केल्या. यावर्षी हार्दिक ने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करत एका वर्षात टीम इंडिया साठी 500 हून अधिक धावा करणार हार्दिक पांड्या हा पहिला खेळाडू ठरला असून, त्याच्या नावावर हा नवीन विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे.
आज झालेल्या या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये के एल राहुल आणि रोहित शर्मा भारताचे सलामीवीर होते. केल राहुल 5 धावा करून बाद झाला, तर रोहित ने 28 चेंडू 27 धावा केल्या. दरम्यान, विराट कोहलीने या सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले.
आज झालेल्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघावर 10 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी 20 विश्वचषक सामन्यातील अंतिम सामना पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे…”; मनसेचा राऊतांवर निशाणा
- Uddhav Thackeray | कर नाही त्याला डर कशाला जे घाबरून पळाले त्यांना हा धडा आहे – उद्धव ठाकरे
- IND vs ENG T20 WC | इंग्लंडने 10 विकेटने एकतर्फी मुकाबला जिंकला, भारताचा लाजिरवाणा पराभव!
- Sanjay Raut …म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार – संजय राऊत
- Sanjay Raut Update | संजय राऊत जेलमधून घरी आल्यानंतर भाऊ सुनिल राऊत यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

