Share

Chitra Wagh । “संजय राठोड विषय आता संपवूया”; चित्रा वाघ असं का म्हणाल्या?

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh । अमरावती : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात यवतमाळचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) दोषी असल्याचा ठपका देवेंद्र फडणवीस (Dvendra Fadanvis) आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठेवला होता. मात्र आता स्वतः चित्र वाघ यांनीच यातून यु टर्न घेतलेला दिसत आहे. “संजय राठोड हा विषय आता संपवूया”, असं मोठं वक्तव्य भाजपा महिला आघाडीच्या  प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलंय.

त्या म्हणाल्या, संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात न्यायालयात माझा लढा सुरू राहील, असंही चित्रा वाघ (Chitra Wagh) यावेळी बोलताना म्हणाल्या. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही विचारा”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांना टोला लगावला.

काय आहे प्रकरण?

टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असणारी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातल्या वानवडी परिसरात 7 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या कथित फोन संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील भाजपने सादर केल्या होत्या. त्यांनतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. जून-जुलै 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे-भाजप सरकार आलं. एकनाथ शिंदे गटात संजय राठोड शामिल झाले. यांनतर चित्र वाघ यांची भूमिका काय असणार याकडं सर्वांच्या नजर लागल्या होत्या. यावर त्यांनी हा लढा न्यायालयात सुरु ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!