🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. संजय राऊत (Sanjay raut) यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘टायगर इज बॅक’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात येत होत्या.
आदित्य ठाकरे यांनीही ‘संजय राऊत नॉट आऊट’ म्हणत आगामी काळात संजय राऊत पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. यावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. काल पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.
कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता …
सूर बदले बदले हैं जनाब के …
राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील …
लवंडे जोमात,मातोश्री कोमात …— Gajanan Kale (@MeGajananKale) November 10, 2022
त्याचबरोबर या ट्वीटमध्ये गजानन काळे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा ‘राजकारणातील अलका कुबल’ असा उल्लेख काळे यांनी केलाय.
“सूर बदले हैं जनामब के..राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील. लवंडे जोमात. मातोश्री कोमात”, अशा आशयाचं ट्विट गजानन काळे यांनी केलंय.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG T20 WC | काय खेळलास भावा…! हार्दिक पांड्याची आश्चर्यकारक कामगिरी
- Uddhav Thackeray । “न्यायालय बुडाखाली घेण्याचा प्रयत्न…”; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर सडकून टीका
- Salam Venky | काजोलने शेअर केला ‘सलाम वेंकी’ चा फर्स्ट लूक
- IND vs ENG T20 WC | विराट – पांड्याची तुफानी खेळी, इंग्लंडसमोर भारताचे 169 धावांचे लक्ष
- Chitra Wagh | अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

