Share

IND vs ENG T20 WC | इंग्लडने भारतीय गोलंदाजांना धो-धो धुतले, सर्व बॉलर फ्लॉप!

Published On: 

🕒 1 min read

IND vs ENG T20 WC | T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने इंग्लंडला 169 धावांचे लक्ष दिले. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरवात चांगली राहीली. पहिल्या 6 ओव्हरमध्ये इंग्लंडने 63 धावा केल्या. बटलर आणि हेल्सने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडने हा सामना 10 विकेट राखून जिंकला भारताचा एकही गोलंदाज चालला नाही. अशा स्थितीत भारत बाहेर पडला, तर इंग्लंडचा संघ १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्सची तारांबळ उडाली. भुवनेश्वर कुमारने अवघ्या 2 षटकात 25 धावा दिल्या. तर मोहम्मद शमीचे षटके देखील महाग पडले. यामुळेच टीम इंडिया एकही विकेट घेऊ शकली नाही आणि बटलर-हेल्ससमोर शरणागती पत्करली.

भुवनेश्वर कुमार – 2 षटके, 25 धावा
अर्शदीप सिंग – 2 षटके, 15 धावा
अक्षर पटेल – 4 षटके, 30 धावा
मोहम्मद शमी – 3 षटके, 39 धावा
रविचंद्रन अश्विन – 2 षटके, 27 धावा
हार्दिक पांड्या – 3 षटके, 34 धावा

इंगल्डंचा खेळ –

अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांच्यासमोर टीम इंडियाच्या बॉलिंग प्लॉप गेली. भारताला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य अगदी सहज गाठले.

या डावात इंग्लंडने एकही विकेट पडू दिली नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाज  फसले. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा केल्या, तर कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूत 80 धावा केल्या. इंग्लंडने 169 धावांचे लक्ष्य अवघ्या 16 षटकांत पूर्ण केले.

भारताचा खेळ –

ओपनिंगसाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी मैदानात आले आहे. केएल राहुल 5 धावांवर बाद झाला. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर केएल राहुलने त्याचा झेल जोस बटलरकडे सोपवला. केएल राहुलच्या विकेटनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली जोरदार पलटवार करत आहेत. पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या एका विकेटच्या बदल्यात 38 झाली आहे. मात्र 56 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. रोहित शर्मा 27 धावांवर झेलबाद झाला. त्याच्या जाग्यावर सुर्यकूमार यादव मैदानावर आला आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला उपांत्य फेरीत फारशी कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमार यादव अवघ्या 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला आणि भारताची तिसरी विकेट पडली. तेव्हा भारताची धावसंख्या 12 षटकात 77 धावांत 3 विकेट्स अशी होती. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांची अर्धशतकीय भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली 50 धावांवर झेलबाद झाला. डावाच्या 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो ख्रिस जॉर्डनकडे आदिल रशीदच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत फंदाजीसाठी आला. हार्दिक पांड्या दबावात चांगली बॅटींग केली. त्याने 33 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली.

विराट कोहलीचा मोठा विक्रम-

विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म कायम असून सेमीफायनलमध्येही त्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध आपले अर्धशतक पूर्ण केले असून टी-20 क्रिकेटमधील हे त्याचे 37 वे अर्धशतक आहे. विराट कोहलीने या डावात एक मोठा विक्रम केला आहे आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत, असे करणारा तो पहिला क्रिकेटर आहे.

हार्दिक पांड्याची आश्चर्यकारक कामगिरी-

हार्दिक पांड्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. भारतीय संघ अडचणीत असताना हार्दिकने येथे शानदार फलंदाजी करत अवघ्या 33 चेंडूत 63 धावा केल्या. यादरम्यान हार्दिक पांड्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. हार्दिकची खेळी नसती तर कदाचित या सामन्यात भारताला खूप संघर्ष करावा लागला असता.

हार्दिक पांड्याच्या या खेळीमुळे भारताने 20 षटकात 168 धावा केल्या आहेत. या डावात टीम इंडियाने एकूण 6 विकेट्स गमावल्या. भारताकडून हार्दिक पंड्या 63 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!