Share

मनसे म्हणजे गळकं घर तर शिवसेना चिरेबंदी वाडा, पालक मंत्री सुभाष देसाईंचा मनसेला टोला!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गुरुवारी पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा झाला. मात्र यावेळी मोठा धक्का हा मनसेला मिळाला. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे औरंगाबादमध्ये येण्यापूर्वीच मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले आहे. यावेळी देसाई यांनी मनसे म्हणजे गळकं घर आणि शिवसेना चिरेबंदी वाडा असा टोलाही मनसेला लगावला.

शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. सिडकोतील रहिवाशांना त्यांच्या घराचा हक्क देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचे पर्व सुरू झाले असल्याचे देखील सुभाष देसाई म्हणाले. क्रांती चौकातील शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ. उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

१४ डिसेंबर रोजी शहरात मनसेच्या पक्षबांधणीसाठी राज ठाकरे येत आहेत. मात्र त्यापूर्वीच शहरात मनसेला गळती लागली आहे. या कार्यक्रमात बोलतांना देसाई म्हणाले, मनसेही गळकं घर असल्याने मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. येथे प्रवेश मिळतो पण बाहेर जाण्यासाठी कुणी दरवाजा उघडत नाही. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सतीश फुलारे, शंकर कदम, अक्षय मस्के, माजी नगरसेवक कांतीलाल नेरपगार यांच्यासह आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!