उस्मानाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकर लसीकरण आवश्यक असून, मोठ्या शहरात खासगी रुग्णालय व कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सशुल्क लसीकरण होत आहे. त्यामुळे छोटी शहरे व ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत लसीची किंमत आमदार स्थानिक विकास निधीमधून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत लस उपलब्ध केली जात आहे. तर १८ ते ४४ या वयोगटाला राज्य सरकारने मोफत लस देण्याची घोषणा केली. याच बरोबर खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण केले जात आहे. गेल्या आठवड्याचा विचार केल्यास मुंबईत शासकीय लसीकरणापेक्षा अधिकचे खासगी सशुल्क लसीकरण झाले आहे. मोठी शहरे सोडली तर या प्रकारचे लसीकरण राज्यात इतर कोठेही सुरू नाही. प्रत्येक विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांना कोविडच्या लढ्यात स्थानिक विकास निधीतून एक कोटी खर्चाची मुभा आहे.
आमदार स्थानिक विकास निधीमधून लसीच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम उपलब्ध केल्यास अनेक जण सशुल्क लसीकरणासाठी पुढे येतील. उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यात या माध्यमातून १० हजार नागरिकांचा विशेष लसीकरण कार्यक्रम या माध्यमातून पूर्ण करता येईल. त्यामुळे प्रत्येक आमदारांना या सशुल्क लसीकरणाच्या मोहिमेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५० टक्के पर्यंतची लसीची किंमत आमदार निधीतून देण्याची खास बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
- महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?
- राज्य सरकारकडून अधिकृत नियमावली जाहीर, सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

