सांगली: हिवाळी अधिवेशनावरून राजकारण चांगलेच तापत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सदभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) त्याच सोबत महाविकास आघाडी सरकारवरवर चांगलाच निशाणा साधला आहे. अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही, असा खोचक टोला देखील सदभाऊ खोत यांनी लगावला आहे.
वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही, असा टोला देखील सदभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. गेल्या 2 वर्षात सरकार अधिवेशनातून सारखं पळ काढत आहे. यंदाच अधिवेधन देखील ओमायक्रॉनच्या पाठीवर बसून आलंय. पाच दिवसाचे हे अधिवेशन घेत आहेत. देशाचे अधिवेशन महिनाभर सुरू राहते आणि महाराष्ट्रचे अधिवेशन फक्त पाच दिवसच का, असा प्रश्न देखील सदभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही. प्रत्येकवेळी वाघ बिळात जाऊन बसतोय, बिळातून बाहेर या आणि खरा वाघ दाखवा, आम्ही खरा वाघ या अधिवेशनात बघायला उत्सुक आहे, असे म्हणत आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हा माणूस मला नेहमीच डँबीस वाटायचा; शरद पोंक्षेंचा ब्राह्मण महासंघाच्या ‘त्या’ व्यक्तीवर आरोप
- ‘अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असेल’
- ‘तेव्हा माझे चेंडू ईडन पार्कच्या बाहेर पाठवले होते’, एजाज पटेल, वीरेंद्र सेहवागचे ट्विट चर्चेत
- बॉलीवूडमध्ये तब्बल २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्शद वारसी म्हणाला.. ‘मला धक्का बसला..’
- मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

