मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. त्याचबरोबर सरनाईक यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
ही माहिती प्रसारमाध्यमांना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: दिली. आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 सुरु झाले असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, काही लोकांनी माझ्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला. खोट्या बातम्या परसवल्या. ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची राज्य आणि देशपातळीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. काही लोकांनी तर माझ्या घरी इडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा केला.
पुढे बोलताना ते म्हणाले,राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागिदारी आणि काहींनी विदेशात निर्माण केलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडल्याचे म्हटले. परंतू, हे सर्व धादांत खोटे आहे, असे म्हणत आपल्यावरील सर्व आरोप प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावले.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही … मुनगंटीवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी
- धनगर आणि आदिवासींच्या प्रश्नी पडळकरांचे हटके आंदोलन,ढोल वाजवून केला सरकारचा निषेध
- महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवाजी‘ चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?
- ‘कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच; शेतकऱ्यांनी दोन पाऊले मागे हटून सरकार शी चर्चा करावी’


