Share

कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही … मुनगंटीवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी

Published On: 

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर देखील विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता.

दरम्यान, कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि आक्रमक भूमिका घेतली. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. करोना, करोनाचा बाप, करोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे”.

तत्पूर्वी, विधिमंडळ सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला. राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन तरी सुरु आहे. पण महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन दाबलं जात आहे. मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे. राज्यात ही एकप्रकारे आणीबाणीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्रावर बोलावं. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्यामुळं राज्यातील प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे असं ते म्हणाले.

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. बांधावर जाऊन दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!