🕒 1 min read
मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण,धनगर आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे.दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील आंदोलन होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान,मुंबईच्या एन्ट्री पॉंईटवर पोलिसांकडून तपासणी सुरु आहे.ठाण्यात आनंदनगर येथे मुंबईच्या दिशेने चाललेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला, त्यानंतर एसटी चालकाने हा झेंडा काढला.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1338383207104794626?s=20
या संतप्त प्रकरणावरून भाजपनेते निलेश राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच आयुष्य पणाला लावलं त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा झेंडा काढण्याची वेळ ह्या हरामखोर ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवाजी‘ चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही … मुनगंटीवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी
- धनगर आणि आदिवासींच्या प्रश्नी पडळकरांचे हटके आंदोलन,ढोल वाजवून केला सरकारचा निषेध
- विधिमंडळाच्या सभागृहाच्या पटलावर ‘हे’ अध्यादेश आणि विधेयक मांडले जाणार
- ‘कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच; शेतकऱ्यांनी दोन पाऊले मागे हटून सरकार शी चर्चा करावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

