Share

मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर देखील विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता.

दरम्यान, राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन तरी सुरु आहे. पण महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन दाबलं जात आहे. मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे. राज्यात ही एकप्रकारे आणीबाणीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्रावर बोलावं. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्यामुळं राज्यातील प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. बांधावर जाऊन दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!