Share

‘कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच; शेतकऱ्यांनी दोन पाऊले मागे हटून सरकार शी चर्चा करावी’

Published On: 

नागपूर   – केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांचा हिताचे असून शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो त्यातून त्याला लाभ होईल ,त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन पाऊल मागे हटून सरकारशी संवाद साधावा असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

रामदास आठवले काल नागपूर दौऱ्या वर आले असून त्यांनी सर्वप्रथम दीक्षाभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला वंदन केले. दीक्षा भूमी स्तुपात सामूहिक बुद्ध वंदना घेतली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रभाकर दुपारे लिखित बुद्धीमय थायलँड या पुस्तकाचे प्रकाशन ना रामदास आठवले यांनी केले.या पुस्तकास  रामदास आठवले यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

नागपूर दौऱ्यावर ना रामदास आठवले आले असता येथील आझाद विदर्भ सेना प्रमुख आशिषकुमार बुराडे यांनी रिपाइं मध्ये जाहीर प्रवेश करून त्यांची आझाद विदर्भ सेना ही संघटना रिपाइं मध्ये विलीन केली. यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र  प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार लवकर योग्य तोडगा काढेल. शेतकरी संघटनांनी ही मध्यम मार्ग काढावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!