Share

धनगर आणि आदिवासींच्या प्रश्नी पडळकरांचे हटके आंदोलन,ढोल वाजवून केला सरकारचा निषेध

Published On: 

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण,धनगर आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर देखील विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता.दरम्यान, आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जोरदार आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून आणि पारंपारिक वेशभूषेत सभागृह परिसरात पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं असताना गोंधळ झाल्याचं चित्र होतं.“हे सरकार झोपलं आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचं श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागं करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले.

“विरोधक असताना हीच लोक नागपुरात डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडं, हातात काठी घेऊन आंदोलन करताना दिसली. आता सत्तेत असताना हे धनगरांचा तिरस्कार करत आहेत,” असा आरोप पडळकरांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!