🕒 1 min read
बीड : केज-अंबाजोगाई मतदारसंघात कोरोना काळात झालेल्या सीसीटीव्ही व इतर भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार नमिता मुंदडांनी विधिमंडळात मांडला. आरोग्य प्रश्नांसह शेतकऱ्यांना मदत, मुकूंदराज सभागृहातील महागड्या खुर्ची खरेदीचा प्रश्नही त्यांनी तारांकित प्रश्नांत उपस्थित केला. हे महत्त्वाचे मुद्दे पटलावर आल्याने आता ते मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोरोना काळात जिल्ह्यासह केजमध्ये उपाययोजनेच्या नावाखाली रुग्णालयातील रंगरंगोटी, दुरूस्त्या, सीसीव्हीटी कॅमेरे खरेदी करून यंत्रणा आणि ठेकेदारांनी शासकीय तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप आ.मुंदडा यांनी केला आहे. यासह नगर पालिकेतील सत्ताधारी अध्यक्षाने साडेचार हजाराची खुर्ची वीस हजार रूपयांनी खरेदी केली. रुग्णालयासह पालिकेतील सभागृहाच्या गैरव्यवहाराचा प्रश्न विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या तासामध्ये तारांकीत केले. तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी दहा हजार रूपये अनुदान जाहिर केले होते. मात्र, बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना १७०० रूपये तर काहींना एक हजार रूपये अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या दुःखावर मिठ चोळले असल्याची टीका मुंदडा यांनी केली.
८२ पैकी ३४ कामे महाविकास आघाडीने रद्द केली
विधानसभेत मुंदडा म्हणाल्या, फडणवीस सरकारच्या काळामध्ये ग्रामविकास खात्याने ग्रामीण भागातील ८२ रस्त्यांना मंजुरी दिली होती. लॉकडाऊनच्या दरम्यान ८२ पैकी ३४ कामे महाविकास आघाडीने रद्द केली आहेत. त्यात २४ रस्ते केज मतदार संघातील आहेत. राजकीय द्वेषपोटी विरोधी पक्षाने मंजुर रस्ते रद्द केल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज-गेवराई दोन्ही मतदार संघ भाजपाकडे असल्यामुळे त्यांच्यावर जाणीवपुर्वक अन्याय केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न
- भाजपनंतर ‘महाविकास’कडूनही धनगर समाजाची अवहेलना, धनंजय मुंडेंची खंत
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
