Share

स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !

Published On: 

मुंबई : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि विदर्भात कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याने लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या काळात काही हलगर्जी पणा घडल्याच्या  घटना समोर येत आहेत. यामध्ये बुलडाण्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी पंडितराव देशमुख यांना कोरोनाची चाचणी न करता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असा मेसेज आला आहे.

पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी केवळ आपली नाव नोंदणी केली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पंडितराव देशमुख यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तपासणीसाठी वेळ दिला. मात्र ते या ठिकाणी परत तपासणीसाठी गेलेच नाही. त्यानंतर कोविड सेंटरमधून त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे. कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पंडितराव यांना धक्का बसला. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांनी मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे मिळाली.

मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये काय सुरु आहे ,याचा यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. रुग्णाचा स्वॅब न देता या मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतात तरी कसे? याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पूरी यांना विचारणा केली असता त्यांनी सॅम्पल कन्टेनरला चुकून दुसऱ्याचं नाव टाकलं गेले असल्याची चूक कबुल केली. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या जिल्ह्यातील कोविड सेंटर कशी चालतात अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!