Share

पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न

Published On: 

बीड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. याचा राग त्यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षनेत्यांवर काढला. मात्र, तो थेट लागला कार्यकर्त्यांना. यामुळे पंकजा यांच्यासह कार्यकर्तेही पक्षापासून काही प्रमाणात दुरावले. त्यानंतर कोरोनाचे लॉकडाऊन यामुळे भाजपच्या माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या परळी या आपल्या मतदारसंघापासून काहीशा दुरावल्या होत्या. मतदारसंघातील त्यांचा संपर्क कमी झाला होता. यामुळे संघटना आणि कार्यकर्त्यांमध्येही काही प्रमाणात मरगळ आली होती. दरम्यान, आता प्रदीर्घ कालावधीनंतर पंकजा पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. परळीत त्यांनी गुरुवारी बैठक घेऊन बूथ रचनेचा आढावा घेतला.

पंकजा मुंडे पुढील तीन दिवस परळीत असणार आहेत. मतदारसंघातील बुथ रचना समितीच्या बैठकांमधून त्यांनी संघटना बांधणी करण्यावर भर दिला आहे. गुरुवारी परळी ग्रामीणचे शक्ती केंद्रप्रमुख व प्रभारींची बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे, समन्वयक शंकर देशमुख या वेळी उपस्थित होते.

यावेळी पंकजा म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी मतदारसंघात संघटनात्मक ताकद मजबूत करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. सत्तेची दोन वेळा संधी सोडली तर आपण विरोधी बाकावरच जास्त काळ होतो, सुरवातीपासून आपण पक्ष संघटनेवर भर दिला होता. आता पुन्हा एकदा तशीच सुरवात करायची आहे. त्यासाठी सर्वानी आतापासून कामाला लागण्याची गरज आहे असे पंकजा म्हणाल्या.

वन बूथ थर्टी यूथ
संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने मतदारसंघातील प्रत्येक बूथ मजबूत असणे आवश्यक आहे. वन बुथ टेन युथ हया धोरणात पक्षाने बदल केला असून आता ‘वन बूथ थर्टी यूथ’ अशी बांधणी करायची आहे. बूथ रचना ऑनलाइन होणार असून त्यासाठी ॲप देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या ६ एप्रिल रोजी भाजप स्थापना दिनापासून गावोगावी शाखा स्थापन करून उघडण्याचा संकल्प करत पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!