औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासुन प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर ही योजना सुरु करण्यासाठी मी पाच कोटी ८५ लाख रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सत्तेत असतांना योजनेबद्दल ब्र शब्दही न काढणारे या योजनेतील गैरव्यवहाराबद्दल बोलत आहेत. त्यांना भ्रष्टाचार आत्ताच आठवला का? असा सवाल करत माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी बुधवारी विरोधकांवर तोफ डागली. बोरदहेगाव येथे दिवंगत माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संवाद सभेत ते बोलत होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदार संघातुन शेतकरी विकास पॅनलकडुन आप्पासाहेब पाटील, व विशेष मागास प्रवर्गासाठी असलेल्या राखीव मतदारसंघातुन वैजापुरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी हे निवडणुक रिंगणात आहेत. बागडे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासुन मी सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. कुठलीही योजना किंवा संस्था बंद पडल्यानंतर ती पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. असे भुमरे यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेला चालु वर्षात साडे आठ कोटींचा निव्वळ नफा झाला असुन साडे आठशे कोटी रुपयांच्या कर्जमाफीमुळे बँकेची परिस्थिती सक्षम आहे. बँकेने साडेपाचशे कोटी रुपये कर्जरुपाने वाटप केले आहेत. पण कर्जमाफी हा अंतीम पर्याय नाही. असे मत नितिन पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसुल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विद्यमान चेअरमन नितिन पाटील, माजी आमदार आण्णासाहेब माने, संचालक अभिजित देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
परदेशींना मताधिक्य मिळणार
या कार्यक्रमाला सहकारी संस्था मतदार संस्था मतदार संघातील ११५ पैकी ९२ मतदार हजर होते. त्यामुळे या पॅनलचे उमेदवारी उमेदवार विजयी होतील. डॉ. दिनेश परदेशी हे सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास महसुलमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- शिक्षकांसाठी गोड बातमी : अमित ठाकरेंनी दिलेला शब्द काका उद्धव ठाकरेंनी केला पूर्ण !
- सोन्याचे आमिष दाखवत एक लाख चाळीस हजार रुपयांना फसवले
- झोमॅटो प्रकरणातील हितेशाने सोडले बंगळुरू पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण
- केदार जाधवने केली नव्या प्रवासाला सुरुवात ; फोटो शेअर
- शहरातून तीन दुचाकी चोरीला


