Share

Vishwajeet Kadam | हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु – विश्वजित कदम

Published On: 

सांगली : शिवसेना नेते संजय राऊत यांना झालेल्या अटकेवर बोलताना काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी देशात हुकूमशाही विरोधात देशाचा इतिहास कसा आहे याची आठवण करून दिली. देशामध्ये आता लोकशाही राहिले की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय हेतूने विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, निश्चितपणे हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे, पण ज्यांनी ज्यांनी या देशावर जुलमी कारभार केला त्याच्या विरोधात मोठी लाट स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये उभी राहिली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये हुकूमशाहीला नष्ट करण्याचे काम झालेलं आहे हा या देशाचा इतिहास आहे आणि या इतिहासाची निश्चितपणे पुनरावृत्ती होईल अशी आशा विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली. सरकार विरोधात आवाज उठवला गेला की लगेच आवाज उठवणाऱ्या विरोधात केंद्रीय यंत्रणा कारवाई करतात हा नजीकचा इतिहास आहे.सोनिया गांधी,राहुल गांधी यांनाही टार्गेट केलं जातं.सातत्याने त्याना देखील चौकशीसाठी बोलावलं जाते. विरोधक शिल्लकच ठेवायचा नाही हा चंग सत्ताधाऱ्यानी बांधलेला दिसतो आहे, पण विरोधक शिल्लक न ठेवणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय की काय अशी भीती कदम यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!