मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मध्यरात्री रात्री 12 वाजता ईडीने ही कारवाई केली. अटक करण्यापूर्वी संजय राऊत यांची 16 तास चौकशी करण्यात आली होती. त्यांना आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. जिथे ईडी त्यांना ताब्यात घेण्याची मागणी करेल. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी 60 वर्षीय राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही अटक चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतच्या अटकेची माहिती भाऊ सुनील राऊत यांनी दिली. संजय राऊत यांना ईडी घाबरते, म्हणून त्यांना अटक केल्याचे ते म्हणाले. सुनील राऊत म्हणाले की, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने संजय राऊत यांना पत्रा चाळशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचा आवाज दाबण्यासाठीच ही अटक करण्यात आली आहे. जी काही रक्कम मिळाली, ती शिवसैनिकांच्या अयोध्या भेटीसाठी होती. त्या पैशावर एकनाथ शिंदे अयोध्या यात्रा असेही लिहिले आहे.
यानंतर आता थोड्या वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या परिवाराची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडुप मधील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आई आणूनि पत्नीची भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊतांच्या कुटुंबियांना धीर दिला त्यांची विचारपूस केली. मात्र यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही . मात्र आज दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya “आगे आगे देखो होता है क्या” ; संजय राऊतांच्या अटकेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया!
- Rajan Vichare | “दिघे साहेब घात झाला… गद्दारीचा शिक्का बसला, छातीवर नाही पाठीवर वार झाला” ; राजन विचारेंचे भावूक पत्र
- Tushar Bhosale | संजय राऊत समस्त हिंदू समाजावर कलंक – आचार्य तुषार भोसले
- Sanjay Raut ED Inquiry | ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे – प्रियांका चतुर्वेदी
- Ravi Rana | नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत… पुढे कोण? मोहित कंबोज यांच्या प्रश्नावर रवी राणा म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

