🕒 1 min read
मुंबई : संजय राऊतांवर आधीही गुन्हा झाला आहे. मेधा सोमय्यांवरील मानहानीची सुनावणी सुरू झालीय. स्वप्ना पाटकर, पत्राचाळ घोटाळा यात कारवाईला सुरुवात झालीय. आणखी वसई-विरारचा घोटाळा, परदेश दौरा, दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण भेटलं होतं. कुठला बिल्डर होता आणि कुठल्या देशातून आला होता. जेव्हा हे सगळं बाहेर येईल तेव्हा नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यात स्पर्धा सुरू होणार असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील. दापोली कोर्टात अनिल परब यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची याचिका दाखल झाली आहे. १७ ऑगस्टला त्यावर निर्णय होणार आहे. उद्धव ठाकरेंकडे नसलेल्या शिवसेनेची दयनीय अवस्था आहे. शिंदे-फडणवीस राज्यात मजबूत सरकार चालवत आहेत. दबावामुळे संजय राऊतांवर कारवाई होत नव्हती. स्वप्ना पाटकर यांच्यावर दादागिरी, धमक्या देणे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे असं त्यांनी सांगितले. तसेच संजय पांडे यांच्या माफियागिरीने संजय राऊत यांच्यावरील गुन्हे दडपले होते. उद्धव ठाकरेंकडे आमदार, खासदार किती हेच त्यांना माहिती नाही असा टोलाही सोमय्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Rajan Vichare | “दिघे साहेब घात झाला… गद्दारीचा शिक्का बसला, छातीवर नाही पाठीवर वार झाला” ; राजन विचारेंचे भावूक पत्र
- Tushar Bhosale | संजय राऊत समस्त हिंदू समाजावर कलंक – आचार्य तुषार भोसले
- Sanjay Raut ED Inquiry | ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे – प्रियांका चतुर्वेदी
- Ravi Rana | नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत… पुढे कोण? मोहित कंबोज यांच्या प्रश्नावर रवी राणा म्हणाले…
- Chandrakant Khaire | संजय राऊतांना ED ने ताब्यात घेतलं, ही महाभयंकर आणीबाणी – चंद्रकांत खैरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
