मुंबई: पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात १६ ते १७ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेतले. तपासात सहकार्य न केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने त्यांची तासन्तास चौकशी केली. यामुळे शिवसैनिक आक्रमक आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केला. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे. तर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना महाराष्ट्रात रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते राजन विचारे यांनी अत्यंत भावूक होत धर्मवीर आनंद दिघे यांना पत्र लिहिलं आहे.
राजन विचारे यांचे पत्र जसेच्या तसे…
प्रति,
धर्मवीर आनंद दिघे साहेब जय महाराष्ट्र…
साहेब पत्राचा कारण आज तुमची आठवण आली. आज 21 वर्ष उलटून गेली एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. परंतु आज जास्त आली. 16व्या वर्षापासून तुमच्या सोबत काम करत आलो, या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझा प्रवासात.. अजूनही आहात.. अंधारात वाट दाखवत.. साहेब, आज मी जेवढा अस्वस्थ आहे, तेवढा कधी झालो नाही.. आज जी घटना घडली, मी नाही फक्त शिवसैनिक नाही तर सामान्य मराठी माणसंही खूप अस्वस्थ झाली आहेत. कुठल्या तोंडाने सांगू घात झाला.. दिघे साहेब घात झाला.. तो पण आपल्या माणसाने केला…
https://www.facebook.com/rajanvicharethane/videos/823230502392846/
ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय-
शिवसेनेच्या 56 वर्षाची इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यातून झाली होती ना साहेब.. तेव्हा तुमच्या 56 इंचाची छाती अभिमानाने भरलेली होती ना साहेब.. ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता, त्या ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय साहेब… छातीवर नाही पाठीवर वार झाला साहेब… या आधी जेव्हा झाला होता, तेव्हा गद्दरांना क्षमा नाही, तुम्ही बोलले होते ना साहेब.. आणि हा दुसऱ्यांदा झाला… पण तुम्ही नाहीत यांना माफ कसं करायचं आम्ही? तुम्ही असतात तर केलं असतं म्हणून तुमची आठवण येत आहे साहेब… आनंद आश्रमात तुम्ही शिव बंधन बाधलं होत साहेब.. ते बंधन आज तुटताना दिसतेय… आणि तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायत.. पण रडायचं नाही लढायचं हा विचार घेवून पुढे जाणारी संघठना आहे. आमची शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करत असताना पाहिलं.. तुम्हाला काळजी नको साहेब.. कारण कुठल्याही व्यक्तीच्या स्वर्थापेक्षा संघटना महत्वाची असते… ही तुमची शिकवण पुढे घेवून जाणारा हा तुमचा राजन आणि तुमचे सच्चे शिवसैनिक आहेत.. कितीही जणं गेले तरी बाळा साहेब आणि तुमचे विचार आमच्या सोबतच आहे साहेब… आम्ही जीवाची बाजी लावू परंतु शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना ही ज्योत विझू देणार नाहीत… आम्ही परत तुमचा सैनिक वाघासारखा उभा राहणार.. कारण तुम्ही दिलेली ताकद आजही त्याच्या मनगटात शाबूत आहे. पुन्हा एकदा प्रवास.. साहेब तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असू द्या.
– तुमचा सच्चा शिवसैनिक राजन विचारे
महत्वाच्या बातम्या :
- Tushar Bhosale | संजय राऊत समस्त हिंदू समाजावर कलंक – आचार्य तुषार भोसले
- Sanjay Raut ED Inquiry | ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे – प्रियांका चतुर्वेदी
- Ravi Rana | नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत… पुढे कोण? मोहित कंबोज यांच्या प्रश्नावर रवी राणा म्हणाले…
- Chandrakant Khaire | संजय राऊतांना ED ने ताब्यात घेतलं, ही महाभयंकर आणीबाणी – चंद्रकांत खैरे
- Eknath Shinde | “निवडणूक आयोगाला ‘खरी’ शिवसेना ठरवू द्या” ; उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंची सुप्रीम कोर्टात धाव!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

