मुंबई : ठाण्यातील ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक मागच्या काही दिवसांपासून गायब असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीने ठाणे वर्तकनगरमध्ये आंदोलन केले. माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि ५० रहिवाशांनी मानवी साखळी करुन आंदोलन केले. Mr.india असे बॅनर हाती घेऊन mr india आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी केली. तसेच याप्रसंगी आमदार सरनाईक हे मातोश्रीवर असल्याचा खळबळजनक आरोपही भाजपने केला.
स्थानिक मतदार मिलिंद नईबागकर आणि हरीष जोशी यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मात्र ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची मदत करताना दिसत नाहीत. जवळजवळ १०० दिवस झाले बेपत्ता आहेत. नेमके ते गायब आहेत कि ते कुठे हरवले आहेत. असा उगाच संशय निर्माण होत आहे. किंवा त्यांना कुणी गायब केले आहे का? या सर्व बाबींचा तपास करून आमदार सरनाईक यांचा शोध घ्यावा.अशी मागणी त्या लेखी तक्रारीत केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले कि, ‘प्रताप सरनाईक गायब असल्याचं आम्हाला सांगण्यात आलय. ते मातोश्रीमध्ये लपलेत असं बोलल जातय. म्हणून वर्तक नगरच्या मतदारांसह गायब आमदारांची तक्रार नोंदवण्यासाठी इथे आलोय. प्रताप सरनाईक मातोश्रीत असतील, तर त्यांना शोधून काढा’ अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर ‘त्या’ लोकांना १५ दिवस क्वारंटाईन करणार ; अजितदादांचा इशारा
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

