मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष उशीरा सुरु झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू मीराबाईने रौप्य पदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टींग स्पर्धेत मीराबाई चानूने भारताला पहिले पदक मिळवुन दिले आहे.
मीराबाई चानुवर सर्व स्तरातून कौतुकचा वर्षाव सुरु आहे. मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मीराबाई चानुला मागे टाकत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या होऊ झिहुईची डोपींग चाचणी होणार आहे. जर या चाचणीत झिहुईने उत्तेजक द्रव्य घेतल्याचे जर आढळलं तर दुसऱ्या क्रमांकावरील मीराबाई चानुला सुवर्ण पदकाचा मान मिळू शकतो. असे झाले तर मीराबाई चानुला सुवर्णपदक बहाल केले जाईल.
मीराबाईने स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात ८४ वजन यशस्वीपणे उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने ८७ किलो वजल लवकर उचलले. यानंतर मात्र तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलण्यात मीराबाई अपयशी ठरली. यानंतर क्लीन अँड जर्क गटात मिराबाईने जोरदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. मीरीबाई चानु ४९ किलो वजन गटात सामिल झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पदकाची आशा कायम
- ‘बावनकुळे मित्रा, बढाया नको मारूस; भाजपाने साधे तुला तिकिटही दिले नाही’
- ‘योद्धा जेव्हा शरण येत नाही…’, आ.धसांनी महिलेचे हॉटेल पाडल्यानंतर समर्थकांची पत्रकबाजी
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

