मुंबई : सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीसंदर्भात अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळते. तसेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपा नेत्यांनीही मागे प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, त्याबद्दल अद्यापही ठोस स्पष्टीकरण कोणी दिले नव्हते. पण आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या युतीबद्दलच्या चर्चांवर भूमिका मांडत भाजप भूमिका स्पष्ट केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युतीच्या चर्चेवर भाष्य केले होते. त्या अनुषंगाने फडणवीस यांना मनसेसोबत युती करण्याबाबत काही चर्चा झाली का अशी विचारणा माध्यमांनी केली. यावर मनसेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला मनसेचे विचार पटत नाहीत. भाजपाने भाषेच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. असा भेद आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मनसे आणि भाजपा यांची विचारधाराच जुळत नसल्याने युतीचा कोणताही विचार नाही.’
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
भाजपा आणि मनसे युतीसंदर्भात खुद्द भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आठवड्यापूर्वी भाष्य केले होते. ‘राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही, असे पाटील म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार
- मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

