Share

‘योद्धा जेव्हा शरण येत नाही…’, आ.धसांनी महिलेचे हॉटेल पाडल्यानंतर समर्थकांची पत्रकबाजी

Published On: 

बीड : चार वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुमच्यामुळे माझ्या पत्नीचा पराभव झाल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस व सहकाऱ्यांनी आमचे हॉटेल पाडल्याची तक्रार राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीने केली आहे. यावरून भाजपचे आमदार सुरेश धसांसह तीस जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सुरेश धस यांच्यावर टीका होत आहे. परंतू त्यांच्या समर्थकांनी मात्र पत्रकबाजी सुरू केली आहे.

‘आमदार सुरेश धस हे कोरोना सारख्या महामारीत गेल्या दीड वर्षापासून आष्टी-पाटोदा -शिरूर तालुक्यात ३२ कोविड सेंटर सुरू करून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी जिल्ह्यातील दिग्गज नेते कोरोनाच्या भीतीपोटी घराच्या बाहेर येण्यास भीत होते. कोरोना योद्धा म्हणून जेव्हा धस यांची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये चालू झाली तेव्हा काही कर्तव्यशून्य असणाऱ्या नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे.

त्यांच्याच सांगण्यावरून धस यांच्यासारख्या योद्ध्यास बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे’, असे मत बीड पदाधिकारी संभाजी सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. ‘योद्धा जेव्हां शरण येत नसतो तेव्हां त्यास बदनाम केले जाते ही राजकिय शैली सर्वांना आज अवगत आहे. आणि हे सर्व कोण घडवून आणत आहे, यामागे कोण आहे, हे देखील तपासले पाहिजे’, अशी मागणी सुर्वे यांनी केली.

काय आहे प्रकरण?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आ. सुरेश धस यांच्या पत्नीच्या विरोधात माधुरी मनोज चौधरी यांनी निवडणूक लढवली होती. पण धस यांच्या पत्नीचा त्यात पराभव झाला. त्यानंतर निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस हे पती मनोज चौधरी यांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देत होते. दरम्यान, नगर-बीड रोडवरील पांढरी हद्दीत वीस गुंठे जागेत हॉटेल मनोज चौधरी यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. परंतू १९ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास आमदार धस यांनी हॉटेलवर बुलडोझर चालविले. तसेच माधुरी चौधरी आणि मनोज चौधरी यांनाही दमदाटी करत दगडाने मारहाण केली. त्यामुळे माधुरी चौधरी यांच्या तक्रारीवरून आमदार सुरेश धसांसह तीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!