Share

झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’

Published On: 

मुंबई : झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली.

हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. याकरिता आघाडीच्या आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खरेदीसाठी विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आरोपीने घेतल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझे नाव या प्रकरणात कसे आले हे माहिती नाही. मी १९ जुलैपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सध्या जालना येथे असून सोमवारी नागपुरात येत असल्याचे बावनकुळे म्हणाले. मात्र १५ -१६ जुलै रोजी आपण कुठे होता, असे विचारले असता त्यांनी ऐकू येत नसल्याचे सांगून फोन कट केला. याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले आहे.

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद या तिन्ही पक्षांचं सरकार आहे. आमदारांचा घोडेबाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोलेबिरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कोंगारी यांनी आपल्यालाही सरकार पाडण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!