Share

‘बावनकुळे मित्रा, बढाया नको मारूस; भाजपाने साधे तुला तिकिटही दिले नाही’

Published On: 

जळगाव : भाजपच्या २५ लाख युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे तीन दिवसांपूर्वी जळगाव येथे आले होते. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली होती. ‘भाजप हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथ खडसे असो की अन्य कोणी असो ते पक्ष सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही,’ असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले.

‘इतके दिवस झाले तरी राष्ट्रवादीने खडसे यांना मंत्रिपद दिले नाही. अजूनही त्यांना लटकवून ठेवले आहे,’ अशी टीकादेखील बावनकुळे यांनी केली. त्याचबरोबर जळगावचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेला आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे हा माझा चांगला मित्र आहे. मित्र म्हणून त्याला सांगणे आहे, अरे बाबा तुला पक्षाने तिकिट दिले नाही. नाथाभाऊंना तिकीट दिले नाही, त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. भाजपने ओबीसींना संपवण्याचे काम केले. त्याच पक्षाच्या तू बढाया मारत आहेस आणि माझ्यावर टीका करीत आहेस. पहिले पक्षात आपले दुकान पक्के कर मग माझ्यावर टीका कर, असा टोला पाटील यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!