Share

ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पदकाची आशा कायम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रविवारचा दिवस भारतीय क्रिडा जगतासाठी खुपच आनंद देणारा ठरला. ऑलिम्पीक स्पर्धेत भारताने टेबल टेनीस, बॉक्सिंग आणि बॅडमिंटन मध्ये विजय मिळवला. तर जागतीक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने भारताकडून सुवर्णपदकाची कमाई केली. आणि क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

रविवारचा दिवस टेबल टेनीसमध्ये मनिका बत्राने गाजवला. तर सोमवारी टेबल टेनीसमध्ये पुरुष संघातील अनुभवी खेळाडू शरथ कमलने दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आहे. शरथने पोर्तुगालच्या टियागो पोलोनियोचा ४-२ असा पराभव केला आहे. ३९ वर्षीय शरथची ही चौथी ऑलिम्पिक वारी आहे. सात फेरीच्या या सामन्यात शरथने सहा सेटमध्ये २-११, ११-८, ११.५ ९-११, ११-६, ११-९ असा विजय मिळवला आहे.

पहिल्या सेटमध्ये पराभव स्विकारल्यानंतर शरथने दुसरा आणि तिसरा सलग दोन सेट जिंकत आघाडी मिळवली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा पराभवाचे तोंड बघावे लागल्याने सामना बरोबरीत आला. यानंतर सलग दोन सेट जिंकत एक सेट बाकी असतानाच विजयावर शिक्काबोर्तब केले. पुढील फेरीत शरथचा सामना आता चिनच्या मा लॉंग विरुद्ध होणार आहे. शरथची ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने यंदा त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!