Share

2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी – राज्यमंत्री संजय बनसोडे

Published On: 

🕒 1 min read

लातूर : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे. याअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत नळजोडणी दिली जाणार असून यातून प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन 55 लिटर पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले, अशी माहिती लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

जल जीवन मिशनबाबत जनजागृती व उमेद अभियानाअंतर्गत आर्थिक साक्षरता, बँक कर्ज वितरणाबाबत आयोजित महिला मेळाव्यात राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरदोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याअंतर्गत गावागावांमधील प्रत्येक कुटुंबाला अधिकाधिक प्रति लिटर पाणी कसे मिळेल यावर भर देत आहोत.

तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या जलजीवन अभियानाविषयी जनजागृती होण्यासाठी आजच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या दिवशी या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रात सक्षमपणे नेतृत्व करणाऱ्या 600 हून अधिक महिला या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत व या अभियानाची ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर यांच्यामार्फत प्रबोधन करण्यात येईल, असा विश्वास वाटतो असे राज्यमंत्री बनसोडे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!