🕒 1 min read
नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.
या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. देशभरातून दिल्ली पोलिसांनी प्राणपणाने लढत दाखविलेल्या अतुल्य पराक्रमाचे, धैर्याचे आणि संयमाचे कौतुक होत आहे.
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही, असा दावा करत हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, अशा शब्दांत कडक कारवाईचा इशारा दिला.
दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही. अन्यथा सगळा देश पेटून उठेल, असा दावा खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते वायनाड येथे बोलत होते.
The truth is that most farmers do not understand the details of the Bill (the three Farm Laws), because if they did, there would be an agitation all across the country. The country would be on fire: Congress leader Rahul Gandhi, in Kalpetta (Wayanad), Kerala pic.twitter.com/Jcgasx72n8
— ANI (@ANI) January 28, 2021
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत देशभरातील बहुतेक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी कायदे, या कायद्यातील तरतुदी, कायद्यातील नियम यांविषयीची माहिती नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याची नीट माहिती झाली, तर देशात मोठे आंदोलन होईल. सगळा देश पेटून उठेल.
महत्वाच्या बातम्या
- माहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी
- अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी
- ‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’
- महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भाजपचे धाबे दणाणले
- ‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

