🕒 1 min read
मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॅाग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले धवलसिंह हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार ही केला होता. परंतु राष्ट्रवादी पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- माहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी
- अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी
- ‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’
- महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भाजपचे धाबे दणाणले
- ‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट


