🕒 1 min read
मुंबई : ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट त्या काळातच लोकप्रिय नसून, आता देखील या चित्रपटाचा चाहता वर्ग बराच आहे. यावर्षी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाले आहे. प्रसिद्ध सिनेमा DDLJ मागील २४ वर्षपासून मराठा मंदिर चितपटगृहात दाखवला जातो.
ह्या सिनेमाचा चाहता वर्ग भारतातच नसून विदेशात देखील पाहायला मिळतो. शाहरुख आणि काजोल यांच्या जोडीला प्रेक्षकांनी बरीच पसंती देखील दिली. आजही शारुख आणि काजोल सोबत काम करताना बघायला चाहत्यांना आवडते. या सिनेमा नंतर काजोल आणि शाहरुख खान यांची जोडी हि बेस्ट जोडी देखील ठरली.
बॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत आदित्य चोप्रा यांच्या या सिनेमाचं नाव नेहमीच घेतलं जातं. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून मराठा मंदिरात सुरू असणारा या सिनेमाचा शो कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान काही काळासाठी बंद होता. मात्र, नोव्हेंबर 2020 पासून हा सिनेमा पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. राज्यात सरकारने सिनेमागृहात बसण्यासाठीची क्षमता 50 टक्क्यांवर आणली आहे. कोरोनाच्या भितीमुळे अजूनही अनेक सिनेमागृहे ओसाड पडलेली असतानाच मराठा मंदिरातील ‘DDLJ’ मात्र आपल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.
सध्या सकाळी 11.30 वाजताच एक शो याठिकाणी दाखवला जात आहे आणि तो पाहण्यासाठी जवळपास 200 ते 300 लोक येत असल्याची माहिती सिनेमागृहाच्या मालकांनी दिली आहे. ते म्हणाले, की मराठा मंदिरमध्ये चालवल्या जाणाऱ्या इतर चित्रपटांना पाहाण्यासाठी सध्या प्रेक्षक येत नाही. अशात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा एकच सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. तसंच विजय थलपतिच्या मास्टर या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर कमाईत आणखी काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले
- रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील
- चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले
- …तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

