🕒 1 min read
वाशी : मनसे आणि आंदोलन यांचं वेगळंच समीकरण आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरून आपल्या स्टाईलने आंदोलन करत असते. यात अनेकवेळा मनसैनिकांवर गुन्हा दाखल होतो. त्यांच्यावर न्यायालयीन खटले देखील चालतात. आता वाशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारी रोजी वाशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायाधीश बडे यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये वाशी टोलनाका फोडला होता. हा टोलनाका फोडण्यास राज ठाकरे यांचं २६ जानेवारी २०१४ रोजीचं प्रक्षोभक भाषण कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी हा टोलनाका बंद करण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनसेच्या गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता.
दरम्यान, या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे न्यायालयात हजर राहणार की नाही, हे महत्वाचं आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे आणि ऍमेझॉन वाद पेटला होता. याप्रकरणी ऍमेझॉनने दोनदोशी न्यायालयात धाव घेतली होती. दोनदोशी न्यायालयाने राज ठाकरेंना समन्स बजावताच मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक शहरात मनसेने ऍमेझॉन कार्यालयांमध्ये खळ-खट्याक आंदोलन केलं होतं. ऍमेझॉनने हे प्रकरण अधिक चिघळण्याआधी माघार घेत राज ठाकरें विरोधातील तक्रार मागे घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले
- महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भाजपचे धाबे दणाणले
- चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले
- DDLJ आणि मराठा मंदिर हे समीकरण आजही ठरतंय Houseful!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

