🕒 1 min read
मुंबई : कोरोनाशी सामना करतांना सध्या सर्वात जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील १० हजार १२७ पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव देखील सादर केला आहे.
सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने बेड्स वाढवण्यात येत आहे. बेड्सची संख्या वाढवण्यात येत असली तरी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ५ संवर्गातील १० हजार १२७ पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
राज्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी पडत आहे. ही पदे भरल्यास आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल. तसेच रुग्णांना देखील चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरतीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्योग क्षेत्राने कामगार कपात टाळावी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
- लॉकडाऊनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम, उद्योग संस्थांची भीती
- हद्दच झाली! रेमडेसिवीरच्या उपलब्धतेवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
- लेटरवॉर! धनंजय मुंडेंनी आव्हान दिले पंतप्रधानांना लिहा पत्र, पंकजांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना
- ‘भाऊ, ‘तो’ हक्क फक्त तुम्हालाच आहे!’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर पलटवार

